नाशिक / नगर सहयाद्री- नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटामधील गळती काही थांबताना दिसत नाही आहे. आज नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी ...
नाशिक / नगर सहयाद्री-
नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटामधील गळती काही थांबताना दिसत नाही आहे. आज नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात मोठं खिंडार पडल्याने ठाकरे गटाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.
विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे.ठाकरे गट आणि महविकासआघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिकमधील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तरी देखील ठाकरे गटातील गळती सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
COMMENTS