निघोज | नगर सह्याद्री शैक्षणिक संस्कृतीला सर्वाधिक महत्त्व असून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील परस्थीतीशी समन्वय साधीत शिक्षण घेण्याची गर...
निघोज | नगर सह्याद्री
शैक्षणिक संस्कृतीला सर्वाधिक महत्त्व असून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील परस्थीतीशी समन्वय साधीत शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण झालेले गौरव वसंत वांढेकर यांनी व्यक्त केले आहे.
वांढेकर हे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विद्याधन शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विद्याधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, शिक्षक भास्कर कवाद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंळगंगा प्रतिष्ठान अध्यक्ष विठ्ठलराव कवाद, व्यवसायीक विकास लंके, श्री. स्वामी समर्थ सहकारी बँकेचे मॅनेजर शंकरराव झावरे, शिक्षक भरत डोके, एम.एस.जाधव, अपेक्षा लामखडे आदी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वांढेकर यावेळी म्हणाले गेली तीन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने मला कोनत्याही शहरांमध्ये लास न लावता निघोज येथेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करावी लागली मात्र काही झाले तरी आपल्याला परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी व्हायचेच आहे. या जिद्दीने मी परिक्षा उत्तीर्ण झालो. विक्री निरीक्षक, बीडीओ तसेच आणखीण दोन विभागाची परिक्षा मी दिली असून लवकरच चांगल्या हुद्द्यावर निवड होउन मला राज्य सरकारची आणी विशेष करुण सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शहरात शिक्षण घेतले तर पास होता येते हे चुकीचे असल्याचे आपण प्रत्यक्षात कृतीतून सिद्ध केले असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, परिश्रम व ध्येय हे उद्दिष्ट ठेउन अभ्यास केला पाहिजे. प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी विद्याधन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षांपासून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. या संस्थेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन नावलौकिक मिळविला आहे. विद्यार्थ्यांना काहीही अडचण आली तर आपण मार्गदर्शक म्हणून तुमच्या बरोबर असल्याची ग्वाही वांढेकर यांनी यावेळी दिली. शिक्षक भास्कर कवाद यांनी यावेळी विद्याधन शिक्षण संस्थेची माहिती दिली. प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भरत डोके यांनी आभार मानले.
COMMENTS