कोल्हापूर / नगर सहयाद्री - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
कोल्हापूर / नगर सहयाद्री -
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राज्यामध्ये राज्यपाल बदलाची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया देताना खोचक टीका केली. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते. राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये राज्यपाल कोण होणार याची चर्चा रंगली आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अजून कोणतेही भाष्य करण्यात आलेलं नाही. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये कोण राज्यपाल येणार हे माहित नाही. मात्र, आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे.
शरद पवार हे शनिवारी सकाळी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर ती आनंदाची बाब ठरेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा आम्ही ऐकली आहे. आमच्याकडेही ठोस माहिती नाही. पण एवढंच सांगतो, या सगळ्यात एकच गोष्ट चांगली होईल. आताचे जे राज्यपाल आहेत, त्यांच्यापासून महाराष्ट्राती सुटका झाली तर आम्हाला आनंदच होईल, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी ठाकरे-वंचित युती, महाराष्ट्र आणि देशाचे राजकारण अशा सर्वच मुद्द्यांवर सविस्तरपणे भूमिका मांडली.
COMMENTS