अहमदनगर | नगर सह्याद्री बडी साजन मंगल कार्यालय स्टेशन रोड येथे पार पडलेल्या शांतीकुमारजी फिरोदिया राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बिलो १६०० मध्...
अहमदनगर | नगर सह्याद्री
बडी साजन मंगल कार्यालय स्टेशन रोड येथे पार पडलेल्या शांतीकुमारजी फिरोदिया राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बिलो १६०० मध्ये पुणे येथील श्रावणी उंडाळे ही विजेती ठरली. स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व प्रमुख अतिथी रिंकूताई फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सचीव यशवंत बापट सर, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त शाम कांबळे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे सर, दत्ता घाडगे,विद्याधर जगदाळे, संजय खडके, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, मनिष जसवानी, प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, अनुराधा बापट, डॉ. स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, पंच प्रविण ठाकरे, सागर गांधी, प्रिती समदानी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की बिलो सोळाशे खाली झालेल्या स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या बुद्धीला चालना देत उत्कृष्ट प्रकारे खेळाचे सादरीकरण केलेले असुन नगर जिल्हयातून अधिकाधिक बुद्धीबळ खेळाडू घडवणार असुन.या विद्यार्थ्याना उत्कृष्ट प्रशिकांकडून बुद्धीबळाचे धडे दिले जातील त्यासाठी अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटना कटिबद्ध राहील. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचीव यशवंत बापट सर यांनी केले. या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..
प्रथम श्रावणी उंडाळे पुणे, दृतिय अथर्व सोनी ठाणे, तृतीय हर्षल पाटील पुणे, चौथा शुभम कांबळे सातारा, पाचवा सोहम खासदरबार कोल्हापूर, सहावा वेदांत गाडगे जालना, सातवा शंकर साळुंखे सोलापूर, आठवा के.जीतीन, नववा प्रदीप पवार सातारा, दहावा विशाल गायकवाड ठाणे, उत्तेजनार्थ सोहम पवार, श्याम अवघड, विश्वजीत जाधव, किरण कांबळे, सोनी सत्यभान.
१३९९ मानांकनचे मानकरी...
प्रथम क्रमांक कार्तिक कुंभार ठाणे, द्वितीय अपूर्वा देशमुख सातारा, तृतीय सोमवंशी प्रसन्न पुणे, चौथा संयम विश्वेश अमरावती, पाचवा धनंजय येसू गडे बीड, सहावा शाश्वत गुप्ता पुणे, सातवा संदीप पाटील औरंगाबाद, आठवा पुनीत धोंडीया ठाणे, नववा अदवती फडके पुणे, दहावा ईशान कुटवाल पुणे, उत्तेजनार्थ सिद्धांत साळुंखे, सौरव दगडखैर, वेदांत पानसरे, ओमकार पाटील, अर्चित देशपांडे....
११९९ मानांकनचे मानकरी...
प्रथम राजवर्धन झवर औरंगाबाद, द्वितीय वैभव चव्हाण नाशिक, तृतीय विश्वकसेना गुब्बा पुणे, चौथा विशाल काळे नगर, पाचवा सोहम शेटे सोलापूर, सहावा किरण सोनवणे जळगाव, सातवा सार्थक भापकर नाशिक, आठवा भुवन शितोळे पुणे, नौवा सौरभ तूपसांगवी पुणे, दहावा प्रशांत नवलकर मुंबई, उत्तेजनार्थ ओजस हिवारे, जनार्दन पाटील, वेदांत इंगळे, तनिष्का राठी, रमेश सोनकर...
..बिगरमानांकित...
प्रथम आदेश ढोकणे नगर, द्वितीय अंशुल ननवाणी अमरावती, तृतीय निखिल नायर ठाणे, चौथा ओजस आंब्रे अकोला, पाचवा आर्यन चक्रबोरते औरंगाबाद, सहावा विवेक भोला, सातवा अर्णव नेतनकर, आठवा अर्णव पवार...
बेस्ट ६० +... प्रथम एम श्याम कुमार नागपूर, द्वितिय देविदास नाईक ठाणे, तृतीय लालगोविंद कोलपेक नगर, चौथा सोमवंशी नथू जलगाव, पाचवा के खान नागपूर, सहावा दिलीप रावल मुंबई, सातवा हरिहर अगस्ती नागपूर, आठवा सुरेंद्र सरदार ठाणे...
बेस्ट वुमेन......
प्रथम साक्षी चव्हाण औरंगाबाद, द्वितिय अर्चिता तोरस्कर मुंबई, तृतिय सृष्टी काळे औरंगाबाद, चौथा देवांशी गवांदे अकोला, पाचवा सोनी पलक औरंगाबाद, सहावा वैष्णवी वि, सातवा स्वधा दातीर, आठवा खुशबू कोकणे... नऊ वर्षाखालील विजेते.... प्रथम श्रेयस नलवडे, द्वितिय राघव पोवडे, तृतिय दर्श पोरवाल, चौथा ध्रुव कोकणे पाचवा अद्विक अग्रवाल, उत्तेजनार्थ प्रसाद क्षितिज, आयान चक्रबोर्ते निवान अग्रवाल....
बेस्ट नगर विजेते
प्रथम सुनील जोशी, द्वितिय गिरीश सरवनकर, तृतिय श्रीराज इंगळे, चौथा सुनील घोडेराव, पाचवा दीपक सुपेकर, सहावा दादासाहेब सदाफल, सातवा अथर्व पाटील, आठवा परम गांधी. या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळामध्ये नाविन्यपूर्ण सादरीकरण करत विजय संपादन केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले.
COMMENTS