लोकांमध्ये पठाणची क्रेझ इतकी वाढली आहे की लोक हा चित्रपट एकदा नाही तर चार-चार वेळा पाहत आहेत.
मुंबई / नगर सह्याद्री -
शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट चित्रपटगृहात चांगलीच कमाई करताना दिसत आहे. लोकांमध्ये पठाणची क्रेझ इतकी वाढली आहे की लोक हा चित्रपट एकदा नाही तर चार-चार वेळा पाहत आहेत. पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत देशभरात १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
शाहरुख खानच्या पठाणने पहिल्या दिवशी ५७ कोटींची बंपर कमाई केली होती. पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा पठाण हा शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट आहे. दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी पठाणने एकूण ६९.५० कोटींचे कलेक्शन केले आहे. शाहरुखचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे.
या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत आहेत. पठाणनंतर शाहरुख खान जवान आणि डंकीमध्ये दिसणार आहे. शाहरुखची तापसी पन्नूसोबतची जोडी यामध्ये दिसणार आहे.
COMMENTS