मुंबई । नगर सह्याद्री - पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष पंडित केशरीनाथ त्रिपाठी यांचे वयाच्या ८८ वर्...
मुंबई । नगर सह्याद्री -
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष पंडित केशरीनाथ त्रिपाठी यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले आहे. ८ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर होते आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहे. मात्र आज ८ जानेवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
केशरीनाथ त्रिपाठी ८ डिसेंबर रोजी बाथरूममध्ये पडले होते. यावेळी त्यांच्या हाताला जबर मार लागला होता आणि फ्रॅक्चर झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवत होता. तसचे शरीरातील ऑक्सिजन देखील कमी जास्त होत होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. रविवारी दुपारी ४ वाजता प्रयागराज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
COMMENTS