चंद्रपूर / नगर सहयाद्री- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातिल बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहलीत विद्यार्थ्यां...
चंद्रपूर / नगर सहयाद्री-
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातिल बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहलीत विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. शाळेच्या बारा विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मिळाल्येल्या माहिती नुसार बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहली दरम्यान सादर घटना घडली. सहलीत विद्यार्थ्यांना एका ठिकाणी चिकनचे जेवण देण्यात आले होते. सर्वांचे जेवण झाल्यानंतर काही वेळाताच विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. सुमारे बावन्न विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यापैकी बारा जणांची प्रकृती ढासळली.
विद्यार्थ्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. आता धाेका टळला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच पाेलिस विभागाचे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत पाेहचले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
COMMENTS