मुलिकादेवी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी निघोज | नगर सह्याद्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी मोठे यो...
मुलिकादेवी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
निघोज | नगर सह्याद्रीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्या शिक्षण सुधारणेमुळे समाजात अमुलाग्र बदल झाल्याचे प्रतिपादन डॉ. विजया ढवळे यांनी केले.
श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. ढवळे व महाविद्यालयातील महिला प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रम सुरु झाला.
डॉ. विजया ढवळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्या भारतीय समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांनी भारतातील महिलांच्या अधिकारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांचे कार्य मोठे आहे. दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. मुलींसाठी, समाजाच्या नाकारलेल्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. समाजात अत्याचारी समाज व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला. सत्य, समानता आणि मानवता यासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महिला सेवा मंडळ सुर केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम केले. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संगीता मांडगे यांनी केले.
COMMENTS