क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी निघोज | नगर सह्याद्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांन...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी
निघोज | नगर सह्याद्रीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा मार्ग दाखवून दिल्याने समाज शैक्षणिक दृष्ट्या सुसंस्कृत झाला असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे.
निघोज ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व महिला भगीनींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, दत्तात्रय ठुबे, ठेकेदार सागर डोकडे, संतोष ठुबे, राजेंद्र झरेकर, विजया दशरथ वाखारे, सुजाता दिगंबर पांढरकर, हर्षदा संपत वाळुंज, शैला सोनवणे, जनाबाई रसाळ, चैताली नामदेव पांढरकर, आकांक्षा लोखंडे, वनिता धाडगे,मंगल ढवण, सत्यभामा गायकवाड आदी उपस्थित होते.
वराळ यावेळी म्हणाले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा मंत्र दिला. महिला ही कुटुंबाची जननी आहे. म्हणून कुटुंब संस्कारक्षम झाले आहे. समाज घडविण्यासाठी महिलांचे योगदान मोठे आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी मोठे योगदान दिल्याने समाजसुधारणेचे खरे काम फुले यांच्या कडून झाले असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांनी आभार मानले.
COMMENTS