नाशिक / नगर सहयाद्री- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध...
नाशिक / नगर सहयाद्री-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची या विषयात ऑनलाईन चर्चा झाली, नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना अखेर भाजपा पाठिंबा देणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याबद्दल लवकरच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घोषणा करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
एका वृत्तसंस्था च्या माहितीनुसार, ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. सत्यजित हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते.यावर आता अखेरचा निर्णय जाहीर झाला असून चंद्रशेखर बावनकुळेंनीही याबद्दल घोषणा केली आहे.
"नाशिकमध्ये भाजपने कोणताही उमेदवार दिलेला नाही, तसेच अद्याप कोणालाही समर्थनसुद्धा दिलं नाही, त्यामुळं भाजपचे मतदार अपक्षा उमेदवाराल मतदान करेल," असे स्पष्टिकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशी थेट लढत असेल.
COMMENTS