धुळे / नगर सहयाद्री- नाशिक विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कुणालाही पाठिंबा दिला नाही. शिरपूरमध्ये मात्र भाजपचे दिग्गज...
धुळे / नगर सहयाद्री-
नाशिक विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कुणालाही पाठिंबा दिला नाही. शिरपूरमध्ये मात्र भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे यांची प्रचार सभा जोऱ्यात पार पडला आहे.
एका वृत्त संस्थ्यांच्या महितीनुसार, भाजपचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे हे स्वत: व त्यांच्या संस्थेचे कर्मचारीही मेळाव्यात सक्रीय सहभागी झाले होते. त्यामुळे पक्षाची भूमिका गुलदस्त्यात पण नेते, मात्र सत्यजित तांबेंच्या पाठिशी आहे, असे चित्र निर्माण झाले असून या प्रकाराची चर्चा जिल्ह्यात सध्या जोरदार सुरु आहे.
माजी शिक्षणमंत्री व भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संस्थेत काल सायंकाळी सत्यजीत तांबे यांची प्रचारसभा पार पडली. अमरीश भाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील सर्व संस्थांचे सर्व प्राचार्य, शिक्षक हजर होते. डॉ. तुषार रंधे यांच्या किसान विद्या प्रसारक संस्थेतील कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुषार रंधे यांच्यासह पदाधिकार्यांनी तांबे यांच्या विजयाचे आवाहनही केले.
COMMENTS