नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या प्रयत्नातून सारसनगर परिसरात रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ अहमदनगर | नगर सह्याद्री शहर विकासाचे नियोजन ...
नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या प्रयत्नातून सारसनगर परिसरात रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
शहर विकासाचे नियोजन तात्पुरते नसून कायमस्वरूपीचे आहे. नगरसेवक प्रकाश भागानगरे हे सर्वसामान्य माणूस असून ते जनतेला २४ तास सेवा देण्याचे काम करत आहेत. सर्वांच्या सहकार्यातून व टीमवर्क असल्यामुळेच शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. सारसनगर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आरसीसी गटार योजनेचे काम सुरू होणार आहे. सारसनगर मधील जुन्या पुलाचे कामही मार्गी लागणार आहे. तसेच मनपाचे गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटन चे कामही लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे शहरात दोन म्युझिकल फाउंटन सज्ज होणार आहे. या माध्यमातून शहर विकासाचे वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सारसनगर येथील महात्मा फुले चौक, सारसनगर पूल ते संदीप नगर वर्धमान अपार्टमेंट पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक निखिल वारे, प्रकाश कराळे, प्रा. तात्यासाहेब दरेकर, ज्ञानदेव पांडुळे,डॉ. सचिन भंडारी, हभप प्रभाताई भोग, शंकर फुलसौंदर, महादेव कराळे, छबुराव काडेकर ,बापूसाहेब ओव्हाळ, विष्णू कलागते, मिलापचंदजी पठवा, रामदासजी कानडे, फुलचंद गांधी,शरदराव भाबरे,बाबासाहेब भगत,समीर खडके, डॉ. राहुल मुथा, प्रकाश इवळे, झुंबरराव आव्हाड, भाऊसाहेब पांडुळे, यशवंत गारडे, दिनेश जोशी, अरुणराव गाडळकर, अशोकराव म्हस्के, दीपक जगताप, सदाशिव तळेकर, मारुती लांडगे, खुडेसर, जालिंदर वाळके, नारायण इवळे,गजानन ससाने राहुल सोनीमंडलेचा, कमलेश पितळे, नयनजी चंगेडिया, नाना फुलसौंदर, कांतीलाल गांधी संजय कटारिया, राजेश बिडवाई आदी उपस्थित होते.
नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की, जगताप कुटुंबीयांमुळेच सारसनगर परिसराचा कायापालट झाला आहे. धार्मिकता वाढीसाठी विविध समाजातील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळेच या ठिकाणी सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान असलेले मंदिरे उभे राहिले आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते नागरिकांचे सहकार्य मिळत असल्यामुळे या भागातील नियोजनबद्ध काम सुरू आहे. जमिनी अंतर्गत कामे मार्गी लावली जात आहे. त्यानुसार रस्त्याचे काम हे हाती घेतले आहे. आमदार संग्राम जगताप हे शहर विकासाची संकल्पना मांडत अभ्यासपूर्वक कामे सुरू आहेत. सारस नगरच्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले.
COMMENTS