हिंगोली / नगर सहयाद्री - शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संतोष बांगर यांनी थेट हिंगोली...
हिंगोली / नगर सहयाद्री -
शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संतोष बांगर यांनी थेट हिंगोलीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यालाच मारहाण करण्याची घटना घडली आहे. संतोष बांगर यांचा पुन्हा एकदा हा मारहाणी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, आमदार बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्याचे नाव डॉक्टर अशोक उपाध्याय आहे. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना १८ जानेवारीला घडली असल्याचं सांगितलं जातंय.
मागील वर्षभरात आमदार संतोष बांगर यांनी अनेक अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांना मारहाण केली आहे आणि आता थेट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
या घटनेनंतर आमदार बांगर यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. आमदार संतोष बांगर यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून त्यांना कायद्याचे कुठलेही भान राहिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.
COMMENTS