सांगली / नगर सहयाद्री - सध्या उठसूठ शहर बंदची हाक देण्याचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे.या सततच्या बंदला कंटाळूनच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर ...
सांगली / नगर सहयाद्री -
सध्या उठसूठ शहर बंदची हाक देण्याचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे.या सततच्या बंदला कंटाळूनच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील व्यापारी महासंघाने एक निर्णय घेतलाय ज्याची सध्या चर्चा होत आहे. यापुढे कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा कुणाचाही बंद असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये फक्त बारा वाजेपर्यंतच सहभागी होतील. त्यानंतर व्यापारी आपापले व्यवसाय सुरू करतील असा महत्त्वपूर्ण निर्णय इस्लामपूर येथील व्यापारी महासंघाच्या वतीने घेण्यात आला आहे.
मिळाल्याल्या माहितीनुसार, शहर बंदची हाक देण्यावरुन सतत बाजारपेठा बंद करण्याची वेळ येत असल्याने एखाद्या शहरातील व्यापारी संघटनेने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. उठ की सुठ कुणीही बंद पुकारते आणि त्यामुळे व्यापारी वर्ग वेठीस धरला जातो .नागरिकांचीही गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन व्यापारी महासंघाने नुकताच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत ही भूमिका जाहीर केली.
व्यापारी संघाने लावलेल्या फलकावर लिहिले आहे की इस्लामपूर व्यापारी महासंघ कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही संघटनांचा बंद असल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत बंद पाळून पाठिंबा दिला जाईल. त्यानंतर सर्व दुकाने उघडली जातील. व्यापारी महासंघाच्या निर्णयाचा कोणतीही संघटना अथवा पक्षाने उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
कोणत्या ना कोणत्या कारणावरुन प्रत्येक शहरात बंदची हाक दिली जाते. यावेळी व्यापाऱ्यांना वेठीस धरलं जातं. आपला बंद यशस्वी झाला आहे हे दाखवण्यासाठी आंदोलक व्यापाऱ्यांना जबदस्तीने दुकांन बंद करायला लावतात. यामुळे इस्लामपूरमधल्या व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की कोणत्याही संघटनेचा, पक्षाचा बंद असेल तर आम्ही पाठिंबा देऊ, मात्र दुपारी बारा वाजेपर्यंतच बंदमध्ये सहभागी होऊ. या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
COMMENTS