संगमनेर । नगर सह्याद्री संगमनेर बीओटी बस स्थानक विकासक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आर.एम.कातोरे यांना अवेध गौण खनिज प्रकरणी 3 कोटी 66 लाख 2...
संगमनेर । नगर सह्याद्री
संगमनेर बीओटी बस स्थानक विकासक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आर.एम.कातोरे यांना अवेध गौण खनिज प्रकरणी 3 कोटी 66 लाख 22 हज़ार 869 रुपये दंड बसला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ पाटील यांनी दिली आहे. खताळ यांच्या 4 वर्षापासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.
संगमनेर येथील बीओटी तत्वावरील बसस्थानक व व्यापारी संकुल बांधकाम मध्ये अवैध गौण खनिज विनापरवाना अवेध वापर करून विकासक आर.एम.कातोरे यांनी गौण खनिज (वाळू, मुरूम, डबर) विशेषता वाळूचा कुठलाही लिलाव संगमनेर येथे झालेला नसताना याकामासाठी मोठ्या प्रमाणात प्रवरा, मुळा नदीपात्रातून वाळू तस्करी करून हे बांधकाम केलेले आहे. तसेच संगमनेर तालुक्यात त्या कालावधीत कोणताही वाळूचा लिलाव झालेला नसतानाही वापरलेली वाळू पूर्णपणे अवैध, वाळू तस्करांकडून अथवा विकासकाने स्वत: नदी पात्रातून विनापरवानगी घेऊन वापरलेली आहे.
तसेच बेकायदेशीरपणे उत्खनन करून दगड, मुरूम वापरलेले आहे अशी तक्रार 2018 मध्ये अमोल खताळ पाटील यांनी तहसीलदार, संगमनेर यांच्याकडे केली होती. तत्कालीन महसूलमंत्री यांच्या दबावापोटी तक्रार कडे दुर्लक्ष केले जात होते तसेच विकासक कातोरे स्थानिक काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी दिरंगाई केली जात होती. तरी अमोल खताळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा, स्मरणपत्र देऊन प्रकरण तडीस नेले.
माहिती अधिकार मध्ये मिळविलेल्या सर्व कागदपत्रा मध्ये बस स्थानक विकासक कातोरे यांनी गौण खनिजबाबत कुठलीच परवानगी घेतलेली नाही असे उत्तर तहसील कार्यालय कडून मिळालेले होते. विकासकाने तहसीलदार संगमनेर महसूल विभागाच्या तोंडी सूचनेनुसार आम्ही रॉयलटी भरली आहे असे मोघम लेखी पत्र दिले होते. विकासक बीओटी कामाबाबत महसूल विभागाची दिशाभूल करून कुठलाही खाण पट्टा आरक्षित नसताना मोघम चलन 30 किवा 31 मार्चला 3 चलन भरणा दाखविला आहे. तो पूर्णता गौण खनिज अधिनियम तरतुदीच्या विरोधी असून त्याबाबत कुठल्या खाण पट्ट्यातून याचा उल्लेख नाही.
चलन बाबत परवानगी पत्र, वाहन क्रमांक, पंचनामा रॉयल्टी, कार्यालयाकडे मागणी केलेले पत्र, ठेकेदाराने आरक्षित केलेला खान पट्टा दगड, मुरूम, वाळू याबाबत गौण खनिज परवाना नोंदवही तपासली असता त्यामध्ये कोणताही परवाना दिलेचे आढळून आलेले नाही.विकासकाने तहसीलदार संगमनेर यांना सादर केलेल्या 520 ब्रासच्या वाळू परवाना प्रती बनावट असल्याचे आढ़लून आले आहे.
बीओटी तत्वावरील बस स्थानक व व्यापारी संकुल कामासाठी वापरण्यात आलेले गौण खनिज उत्खनन बाबत कोणत्याही पक्की परवानगी घेतली नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) नुसार वाळू, मुरूम, डबर, क्रश संड प्रकरणी 3 कोटी 66 लाख 22 हजार आठशे एकूण सत्तर रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश 9 जानेवारी 2023 रोजी काढले.
विद्यमान महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अमोल खताळ पाटील यांनी 4 वर्ष सर्व पुरावे असताना प्रलंबित प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर याप्रकरणाची सुनावणी होऊन दंडात्मक कारवाई तहसीलदार यांनी करावी लागली. राजकीय द्वेषातून दंडात्मक कारवाई- आर. एम. कातोरे
संगमनेरच्या वैभवात भर घालणारे भव्य बस स्थानक उभारण्याची संधी मला मिळाली व तत्कालीन युती सरकारच्या काळात दिनांक 22 जुलै 2016 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कार्यारंभ आदेशानुसार बांधकाम सुरू केले. तदनंतर मार्च 2017 रोजी धांदरफळ गट ता. संगमनेर येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने राजकीय द्वेषातूनच धांदरफळवासीय अमोल खताळ यांनी त्यांचे राजकीय वजन वापरून महसूल प्रशासनाची दिशाभूल करून माझ्यावर दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य कातोरे यांनी केला आहे.
राजकीय द्वेषातून दंडात्मक कारवाई- आर. एम. कातोरे
संगमनेरच्या वैभवात भर घालणारे भव्य बस स्थानक उभारण्याची संधी मला मिळाली व तत्कालीन युती सरकारच्या काळात दिनांक 22 जुलै 2016 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कार्यारंभ आदेशानुसार बांधकाम सुरू केले. तदनंतर मार्च 2017 रोजी धांदरफळ गट ता. संगमनेर येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने राजकीय द्वेषातूनच धांदरफळवासीय अमोल खताळ यांनी त्यांचे राजकीय वजन वापरून महसूल प्रशासनाची दिशाभूल करून माझ्यावर दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य कातोरे यांनी केला आहे.
COMMENTS