खेड्यांचा समृद्ध विकास झाल्यास देश सशक्त बनेल अहमदनगर । नगर सह्याद्री भारत खेड्यांचा देश आहे. खेड्यांच्या समृद्ध व शाश्वत विकासासाठी राष्ट्र...
खेड्यांचा समृद्ध विकास झाल्यास देश सशक्त बनेल
अहमदनगर । नगर सह्याद्री
भारत खेड्यांचा देश आहे. खेड्यांच्या समृद्ध व शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. श्रमदानामुळे खेड्यांचा विकास करता येतो. खेडे समृद्ध झाल्यास देश सशक्त बनेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी केले.
रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दि. 3 जानेवारी ते दि. 9 जानेवारी या कालावधीत हिवरगाव पठार (ता. संगमनेर) येथे होत आहे.
अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रियाताई मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वनवे, यादव नागरे, माधवराव डोळझाके, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब नरवडे, देवराम नागरे, ग्रामविकास अधिकारी विजय आहेर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रणजीत गिरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर आदी उपस्थित होते. सरपंच सुप्रियाताई मिसाळ म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यात व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा वाटा आहे.
शिबिरास संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पा. खेमनर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दीपक फिरोदिया, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीराताई शेटे, प्रा. रोहिदास भडकवाड, सीए रमेश फिरोदिया, सविताबेन फिरोदिया, बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत पाटील खेमनर, विद्यापीठाचे अधिकारी भेटी देणार आहेत. शिबिरात स्वयंसेवकांना प्रा. कल्पना शेळके क्रांती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य, प्राचार्य डॉ. सचिन घोलप आर्थिक साक्षरता, प्रा. निलेश परबत यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली, प्रा. संदीप देशमुख विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात एनएसएसचे योगदान, प्रा. दत्तात्रय आसवले मराठी भाषा संवर्धन, प्रा. शिवनाथ तक्ते आनंदमय जीवन, विजय अहेर स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी, कविता गायकवाड कोरोना एक जैविक आपत्ती, रुपेश नाईकवाडी आजचे शिक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर, प्रा. पोपट खेमनर, प्रा. प्राजक्ता बिडवे, प्रा. कल्पना शेळके, प्रा. संदीप कुदनर, प्रा. राजेंद्र लेंडे ,प्रा. दत्तात्रय आसवले, प्रा. गणेश कुलकर्णी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व हिवरगाव पठारचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS