मुदत ठेवींवर अतिरिक्त व्याज दर देणार्या मर्चंटस बँकेत सुवर्ण महोत्सव ठेव योजनेचा शुभारंभ अहमदनगर | नगर सह्याद्री सभासद, ग्राहकांच्या विश...
मुदत ठेवींवर अतिरिक्त व्याज दर देणार्या मर्चंटस बँकेत सुवर्ण महोत्सव ठेव योजनेचा शुभारंभ
अहमदनगर | नगर सह्याद्रीसभासद, ग्राहकांच्या विश्वासामुळे मर्चंटस बँकेने नेत्रदीपक प्रगती करत सहकारी बँकींग क्षेत्रात ठसा उमटवला आहे. कोरोना महामारी काळात अर्थकारण ठप्प झाले असतानाही बँकेने चांगली सेवा देत आर्थिक कामगिरीची परंपरा कायम राखली. आता सुवर्ण महोत्सव साजरा करताना बँकेने मुदत ठेवीवर तब्बल ७ टक्के व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर देण्यात येत आहे. सभासद, ग्राहकांच्या हितासाठी कायम कटिबद्ध राहू, अशी ग्वाही अहमदनगर मर्चंटस बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत यांनी दिली.
अहमदनगर मर्चंटस बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ३६६ ते ५०० दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर ७ टक्के व्याजदर देण्यात येत आहे. तसेच ६० ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर ७.५० टक्के तर ७० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर ८ टक्के व्याजदर देण्यात येतो. या सुवर्ण महोत्सव ठेव योजनेंतर्गत ग्राहकांनी मुदत ठेवी करण्यास सुरुवात केली आहे. याचा शुभारंभ हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते झाला. यावेळी बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, संचालक किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, अनिल पोखरणा, सीए मोहन बरमेचा, संजीव गांधी, मीनाताई मुनोत, प्रमिलाबाई बोरा, विजय कोथिंबीरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य शरद पल्लोड, राजेश झंवर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पुराणिक, उद्योजक रवींद्र भंडारी, सचिन भंडारी, मालती दहिवाले, सुरेश भागनानी, पी्. डी. ऋषी, सुरेश सिकची, अमोल कटारिया आदी उपस्थित होते ्.
चेअरमन आनंदराम मुनोत म्हणाले, मर्चंटस बँक व्यापारी, व्यावसायिकांची हक्काची बँक आहे. सहकाराला अभिप्रेत काम बँकेने सातत्याने करून नगरच्या अर्थकारणाला चालना दिली. यात चेअरमन हस्तीमल मुनोत यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाचे योगदान आहे. सुवर्ण महोत्सवी ठेव योजना ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर अधिकचा परतावा देणार आहे. बँकेने नेहमीच आधुनिक बँकींग सेवा देण्यावर भर दिल्याने ग्राहकांना लाभ होत आहे. नवीन ठेव योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुवर्ण महोत्सव ठेव योजनेची माहिती देताना संचालक आयपी अजय मुथा म्हणाले, नगरच्या अर्थकारणात मर्चंटस बँकेचा सिंहाचा वाटा आहे. शिस्तबद्ध कारभारामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. सुवर्ण महोत्सव साजरा करताना मुदत ठेवींवरील व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला. योजनेची माहिती मिळताच रवींद्र भंडारी यांनी उत्स्फूर्तपणे पहिली ठेव पावती करत सकारात्मक पोचपावती दिली. हेच प्रेम आणि विश्वास बँकेचे वैशिष्ट्य आहे. या सुवर्ण संधीचा ग्राहक, सभासद, ठेवीदारांनी लाभ घ्यावा.
उद्योजक रवींद्र भंडारी म्हणाले, मर्चंटस बँकेचा ग्राहक असणे अभिमानास्पद वाटते. विश्वास आणि सेवेची मोठी परंपरा या बँकेला आहे. रौप्य महोत्सवी वर्ष, ४० वर्षपूर्ती् अशा संस्मरणीय वर्षात बँकेने सभासदांना विशेष भेट दिली. आता सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेने ग्राहकांशी असलेली बांधिलकी दृढ केली आहे. पुराणिक यांनी आभार मानले.
COMMENTS