मुंबई / नजर सहयाद्री- एखाद्याच्या मदतीला आपण धावून आल्याचं समाधान काही वेगळंच असतं. मुंबईत सध्या अशाच दानशूर महिलेची चर्चा आहे. कामासाठी, रो...
मुंबई / नजर सहयाद्री-
एखाद्याच्या मदतीला आपण धावून आल्याचं समाधान काही वेगळंच असतं. मुंबईत सध्या अशाच दानशूर महिलेची चर्चा आहे. कामासाठी, रोजीरोटीसाठी सतत धावणाऱ्या मुंबईकरांना याची फार खबरबात नसेल. पण वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये एका महिलेच्या दानाशूरतेची चांगलीच चर्चा आहे.
भारताच्या सफरीवर आलेल्या स्पॅनिश महिलेने पाच जणांना जीवनदान दिलं.मुंबईतल्या ५४ वर्षीय डॉक्टरला या महिलेचं यकृत दान करण्यात आलं.नानावटी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली. चार भारतीय नागरिक आणि एका लेबनानच्या नागरिकाचे प्राण वाचले.
टेरेसा मारिया फर्नांडिज असे या स्पॅनिश महिलेचं नाव असून ६७ वर्षांची होती. जसलोक हॉस्पिटलमध्ये एवढे दिवस उपचार घेतल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. अखेर डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. तोपर्यंत तिचे नातेवाईक मुंबईत दाखल झाले होते.या स्पॅनिश महिलेची मुलगी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझ्या शरीराचे अवयव दान करायचे आहेत, ही आईची इच्छा होती, असे महिलेच्या मुलीने सांगितले.
COMMENTS