मुंबई वृत्तसंस्था बॉलिवूडमध्ये सर्वांत फिट अभिनेत्यांमध्ये हृतिकचा उल्लेख आवर्जून केला जातो.आता नुकतेच त्याने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट...
मुंबई वृत्तसंस्था
बॉलिवूडमध्ये सर्वांत फिट अभिनेत्यांमध्ये हृतिकचा उल्लेख आवर्जून केला जातो.आता नुकतेच त्याने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.वयाच्या 48 व्या वर्षी त्याची फिटनेस आणि ॲब्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.
या फोटोंमध्ये हृतिक टी-शर्ट वर घेऊन त्याचे 6 पॅक ॲब्स दाखवताना दिसतोय. सुपर टोन्ड ॲब्स आणि फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.या फोटोंवर सर्वसामान्य चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.‘जुना हृतिक परतलाय’ असं एका युजरने लिहिलं. तर ‘हृतिकच्या ॲब्सलाही ॲब्स आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मला फक्त तुझे दोन ॲब्स देशील का’, अशी विनोदी कमेंट एका नेटकऱ्याने केली. तर ‘हा इन्स्टाग्रामवरील फोटो ऑफ द डे आहे’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं.
“जेव्हा लोक माझी प्रशंसा करतात, तेव्हा मला चांगलं वाटतं. माझ्या कामाचं कौतुक झालेलं मला आवडतं. पण त्यासोबत येणाऱ्या लोकांच्या ज्या अपेक्षा असतात, त्या मला ओझं वाटतात.मला चुकीचं समजू नका.मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत,त्यासाठी मी कृतज्ञ आहे.मात्र हे एक असं ओझं आहे,ज्याला मी उचलून चालतोय,असं मला वाटतं.हे ओझं कायम डोक्यावर ठेवण्यासाठी मला सतत कठोर मेहनत करावी लागले. जेव्हा तुमच्याकडून कोणी अपेक्षा ठेवत नाहीत, तेव्हा तुम्ही सुखी असता”, असं तो म्हणाला.
हृतिक सध्या त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. फायटर हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिक आणि दीपिकासोबतच यामध्ये अनिल कपूरचीही भूमिका आहे.

COMMENTS