अहमदनगर | नगर सह्याद्री भाडोत्री चालविण्यास दिलेली रिक्षा व तिचे भाडे न देता एकाची फसवणूक केली. सुनील लक्ष्मण मिसाळ (वय ४५ रा. तपोवन, साव...
अहमदनगर | नगर सह्याद्री
भाडोत्री चालविण्यास दिलेली रिक्षा व तिचे भाडे न देता एकाची फसवणूक केली. सुनील लक्ष्मण मिसाळ (वय ४५ रा. तपोवन, सावेडी) असे फसवणुक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून केशव गोरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. रूईछत्तीशी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिसाळ यांनी सन २००५ मध्ये रिक्षा विकत घेतली. ते नगर शहरात रिक्षा चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची केशव गोरे सोबत ओळख झाली होती. त्याच्याकडे रिक्षा नसल्याने तो भाडोत्री (शिपने) रिक्षा चालवित असतो. मिसाळ आजारी असल्याने केशव त्यांच्याकडे केला व माझी पत्नी आजारी असून माझ्याकडे रिक्षा नाही, तुम्ही मला भाडोत्री रिक्षा चालविण्यासाठी द्या, मी तुम्हाला पैसे देतो,फ असे म्हणून मिसाळ यांच्याकडून गोरे याने रिक्षा चालविण्यासाठी घेतली. मिसाळ यांनी त्याच्याकडे वेळोवेळी रिक्षाचे भाडे व रिक्षा परत मागितली असता त्याने रिक्षा व भाडे दिले नाही.
COMMENTS