पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील विशाल काळे याने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळविल आहे. शांतिकुमार फिरो...
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील विशाल काळे याने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळविल आहे. शांतिकुमार फिरोदिया मेमोरियलच्या वतीने आयोजित राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा ६ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत अहमदनगर शहरात पार पडल्या. देशभरातून आलेल्या ३१५ स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. तीन दिवस झालेल्या लढतीत ० - १२०० मानांकन प्रकारात एकूण ९ सामन्यात ६ विजय१ लढत बरोबरीत आणि दोन पराभवाचा सामना करत पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील विशाल गोविंद काळे यांना राष्ट्रीय पातळीवर चतुर्थ बक्षिस मिळाले असून विशाल काळे हे अहमदनगर जिल्ह्यातून सहभागी खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांकावर राहिले. अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ नुकताच अहमदनगर येथे पार पडला. विशाल काळे हे पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील आहेत. ते उत्तम व्याख्याते असून सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुयातील सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
COMMENTS