मुंबई / नगर सह्यादी- बॉलिवूडची एंटरटेनमेंट आणि ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत . राखीने बॉयफ्रेंड दिलसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर क...
मुंबई / नगर सह्यादी-
बॉलिवूडची एंटरटेनमेंट आणि ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत . राखीने बॉयफ्रेंड दिलसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. राखीचे म्हणणे आहे की, तिने 7 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केले होते. निकाहसोबतच राखी आणि आदिलने कोर्ट मॅरेजही केले आहे. आदिलने तिला लग्नाची लपवायला सांगितल्याचा खुलासाही अभिनेत्रीने केला आहे.
राखी सावंतने अलीकडे तिच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, आदिल सध्या तिच्याशी बोलत नाही. आदिलवर त्याच्या कुटुंबाकडून आणि लोकांकडून खूप दबाव टाकण्यात येत आहे. राखी म्हणाली की तिची फसवणूक झाली आहे, आदिलचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर आहे. तिच्याशी लग्न करूनही ती अजून एका नात्यात आहे. आदिलचे हे कृत्य पाहून राखीने तिच्या लग्नाचे सत्य सर्वांसमोर आणण्याचे ठरवले आहे.
तसेच राखीने सांगितले की, तिला भीती वाटते की आजकाल जे घडत आहे, तेच तिच्यासोबतही घडू शकते. राखीचे म्हणणे ऐकल्यानंतर ती लव-जिहादकडे बोट दाखवत असल्याचे जाणवले. राखीने तिच्या लग्नाशी संबंधित फोटो आणि कायदेशीर कागदपत्रेही दाखवली आहेत. ज्यामध्ये राखी सावंतने धर्मांतर करून आदिलसोबत लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने आपले नाव फातिमा असे बदलून आदिलशी लग्न केले आहे.
राखी तिच्या लग्नामुळे आणि नंतर रितेशसोबत झालेल्या घटस्फोट घेतल्याने चर्चेत होती. रितेशनंतर राखीच्या आयुष्यात आदिल आला. पण त्याच्या दुसऱ्या लग्न केल्याचे बातमी सर्वांसमोर आहे. राखी जेव्हा आदिलसोबत दिसली होती, तेव्हाही यूजर्स त्यांच्या नात्याबद्दल कमेंट करताना दिसत होते. दोघांनाही अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.
राखी सावंत नुकतीच 'बिग बॉस मराठी ४' या स्पर्धेतून बाहेर आली आहे. स्पर्धेतून बाहेर येताच तिला कळले तिची आई आजारी आहे. तिची आई हॉस्पिटलमध्ये उपचार येत असतानाच व्हिडिओ राखीने शेअर केला होता.
COMMENTS