मुंबई : बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील चर्चेतील चेहर्यांपैकी एक असणार्या आरोह वेलणकरचा प्रवास संपला आहे. प्रसाद जवादे पाठोपाठ आरोहने ...
मुंबई : बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील चर्चेतील चेहर्यांपैकी एक असणार्या आरोह वेलणकरचा प्रवास संपला आहे. प्रसाद जवादे पाठोपाठ आरोहने वेलणकरनेही बुधवारी बिग बॉसच्या घरातून एझिट घेतली. घरातून बाहेर पडताच आरोहने बिग बॉसवर गंभीर आरोपही केले आहेत. आरोहने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत आरोहला राखी सावंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. राखीच्या घरातील वागणुकीमुळे आरोह नेहमीच त्रस्त दिसायचा. अनेकदा त्याचे राखीबरोबर घरात खटकेही उडालेले पाहायला मिळायचे. राखीच्या वागणुकीबद्दल आरोह म्हणाला, राखी एक वेगळी व्यक्ती आहे. ती कशी आहे, यावर मी भाष्य करू शकत नाही. ती ज्या काही गोष्टी करते त्यामुळे प्रचंड टीआरपी मिळतो. पण तिच्याबरोबर घरात राहणं फार अवघड आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळ्या परिस्थितीत लहानाची मोठी होते. प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात. राखीसारखं व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीला मी यापूर्वी कधीही भेटलेलो नाही. बिग बॉसच्या दुसर्या पर्वात अभिजीत बिचुकले होते. पण ते तिच्यासारखे मुद्दाम काही करायचे नाहीत. राखी सगळं ठरवून करते, असंही आरोह म्हणाला. बिग बॉस’च्या घरातून यंदाच्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर पडले. प्रसाद जावदे व आरोह वेलणकर घरातून बाहेर पडल्यानंतर आता टॉप ५ फायनलिस्ट राहिले आहेत. ८ जानेवारील बिग बॉस मराठी’चा अंतिम सोहळा पार पडणार आहे.
COMMENTS