मुंबई नगर सहयाद्री - अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि आघाडीचा भारतीय क्रिकेट फलंदाज केएल राहुल यांचं २३ जानेवारी रोजी खंडाळ्...
मुंबई नगर सहयाद्री -
अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि आघाडीचा भारतीय क्रिकेट फलंदाज केएल राहुल यांचं २३ जानेवारी रोजी खंडाळ्यात मोठ्या थाटामाटात झाला. अथियानं तिच्या हळदी कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अथिया शेट्टीनं शेअर केले हळदी समारंभाचे फोटो. हळदी समारंभावेळी अथिया आणि राहुलनं केली धम्माल मस्ती.
अथियानं तिच्या इन्स्टाग्रामवरून हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये अथिया, राहुल आणि त्यांच्या घरातील मंडळी दिसत आहेत. या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह दिसत आहे. एका फोटोमध्ये अथिया आणि राहुल एकमेकांकडे अतिशय समाधानानं आणि आनंदानं हसताना दिसत आहेत.
आणखी एका फोटोमध्ये अथिया खूपच सुंदर दिसत आहे. त्या फोटोमध्ये तिच्या माथ्यावर मोठ्ठी बिंदी आणि आकर्षक कानातले घातलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करत अथियानं सुख इतकंच लिहिलं आहे. परंतु त्यावरून तिच्या मनातील सर्व भावना व्यक्त होत आहेत.
अथियानं हळदीचे फोटो शेअर केल्यानंतर लगचेच तिचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी कॉमेन्ट मध्ये हार्ट इमोजी शेअर केली आहे. अथियाची सर्वात जवळची मैत्रिण कृष्णा श्रॉफ हिनं देखील हार्टचा इमोटिकॉन शेअर केला आहे.
दोघांनीही या फोटोंना 'सुख' असं कॅप्शन दिलं आहे. 21 जानेवारीपासून अथिया आणि राहुलच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. हळदीच्या कार्यक्रमालाही फक्त कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते.
हळदीच्या कार्यक्रमात अथियाने पिच-पिंक सूट परिधान केला होता.
का कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. अथिया आणि राहुल हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
हळदीच्या कार्यक्रमातील या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल याचा लग्नसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा इथल्या आलिशान फार्महाऊसमध्ये झाला. या विवाहसोहळ्याला दोघांच्या घरचे मंडळी आणि निवडक मित्रमंडळी उपस्थित होते. दरम्यान, अथिया आणि राहुलच्या लग्नाचे फोटो सुनील शेट्टी आणि तिचा भाऊ अहान यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अथिया आणि राहुल हे एकमेकांना चार वर्षे डेटिंग करत होते. अथिया आणि राहुलच्या लग्नाचं रिसेप्शन आयपीएल समान्यांनंतर होणार असल्याची माहिती खुद्द सुनील शेट्टी यानं दिली होती.
COMMENTS