नाशिक / नगर सहयाद्री - नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे प्रकरण राजकारणात खुप गाजतंय, सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ...
नाशिक / नगर सहयाद्री -
नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे प्रकरण राजकारणात खुप गाजतंय, सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती . यावर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला की त्यांच्या मामांनी यास जबाबदार कोण यांचा खुलासा करावं अशी टीका त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे.
मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने भाजप बरोबर युती करून महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार निवडून आणल्यानंतर गद्दारी करून महाभकास आघाडी केली होती. त्यामुळे गद्दारी कोणी कोणाबरोबर केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षांमध्ये महाविकास आघाडी मध्ये बरेच भविष्यकार तयार झाले असून रोज भविष्यवाणी करत आहेत. पूर्वी रस्त्याच्या कडेला बसून पोपटाला घेऊन बसणारे चिठ्ठी द्वारे भविष्य काढायचे आता महाविकास आघाडीचे पोपटपंची जे झालेले आहेत त्यांना माझा सल्ला आहे की, आता हे बंद करा तुम्हाला कोणीही दाना टाकणार नाही. तुम्ही जितक्या वेळा भविष्यवाणी करणार आहात तितका कालावधी सरकारचा वाढणार आहे असे देखील विखे पाटील म्हणाले.
COMMENTS