मुंबई । नगर सह्याद्री - संभाजी बिग्रेडकडून होते आहे ही मोठी मागणीऔरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्...
मुंबई । नगर सह्याद्री -
संभाजी बिग्रेडकडून होते आहे ही मोठी मागणीऔरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता पुण्याच्या नामांतराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पुण्याचे जिजापूर असे नामांतर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने पुन्हा केली आहे.
12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या नामांतराची मागणी पुन्हा लावून धरली आहे. पुण्याचे नामांतर जिजापूर करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून केली जात आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडने अनेकदा ही मागणी केली आहे. राजमाता जिजाऊंनी पुन्हा पुणे वसवलं आणि पुणे हे शहर माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे जिजापूर हे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून होत आहे.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पुण्यातील लाल महाल सजवण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील लाल महालात विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. त्यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.
COMMENTS