पुणे / नगर सहयाद्री आशुतोष माने हा अभिजित सानमुटे,साजिद शेख,स्वप्निल पाटील,मिहीर देशपांडे यांच्यासोबत राहत होता.मागील दोन महिन्यांपासून चौघ...
पुणे / नगर सहयाद्री
आशुतोष माने हा अभिजित सानमुटे,साजिद शेख,स्वप्निल पाटील,मिहीर देशपांडे यांच्यासोबत राहत होता.मागील दोन महिन्यांपासून चौघे रुममेट होते. थर्टी फर्स्टमुळे पुण्यातील काही मेस बंद होत्या.त्यामुळे आशुतोष माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे साई चौकात आले होते. यावेळी पंकजही त्याचा मित्र मयूर फुंदेसोबत आला होता. सर्वांनी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि हॉटेल बाहेर उभे होते. त्यावेळी दुचाकीवरुन दोन मुलं भरधाव आली आणि त्यांनी पंकज आणि मयूरकडे १०० रुपये मागितले.
या मुलांना पंकज आणि मयूरने पैसे देण्यास नकार दिला.त्यावेळी मुलांनी यांच्यावर जबरदस्ती केली.शिवीगाळ करण्याला सुरुवात केली.यानंतर दुचाकीस्वार असलेल्या दोघांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बाकी मित्रांना बोलावून घेतलं. पंकजने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या हातावर धारदार शस्त्रांनी वार केले.यात पंकजचा हात मनगटापासून खाली पडला.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.ही माहिती पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.रक्तबंबाळ असलेल्या पंकजला दवाखान्यात दाखल केलं.त्यच्यावर तातडीने उपचार झाल्यामुळे जीव वाचला.माने यांनी हल्ला करणाऱ्या मुलांचं वर्णन सांगितलं त्यानुसार पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
COMMENTS