पुणे / नगर सहयाद्री- पुण्यात आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे.रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहित समोर आली आहे. MNGL पाइ...
पुणे / नगर सहयाद्री-
पुण्यात आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे.रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहित समोर आली आहे. MNGL पाइपलाइनचं काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला.गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं दूरपर्यंत आजीचे लोळ पसरले होते.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
सिंहगड रस्त्यावर राजाराम फुलाजवळ ही आग लागली असून अग्निशमन दलाची तीन वाहनं आग क्षमवण्याचे काम करीत आहेत. तर एमएनजीएलचे कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल आहेत. या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे इथून वाहतूक वळवण्यात आली असून मुख्य पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही. खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची लाइन लीक झाली आणि हा स्फोट झाला. यामुळे उद्या पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये पुरवठा बंद राहणार आहे. वस्ती नसलेल्या भागांमध्ये हे झालं म्हणून ठीक नाहीतर गंभीर झालं असतं असंही बोललं जात आहे. जोपर्यंत पाईपलाईनमध्ये गॅस शिल्लक आहे तोवर आग सुरू राहणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. तर आतापर्यंत तीन टँकरचा वापर करण्यात आलाय पण तरीही आग अद्यापही धुमसत असल्याची माहिती फायरमॅन राजेश जगताप यांनी दिली.
लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. MNGL पाईपलाईन जरी बंद करण्यात आली असली तरी आजूबाजूला 3 ठिकाणी आग पसरली असल्याने अग्निशामन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. अखेर मध्यरात्री लागलेली ही आग (Fire) आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.
COMMENTS