शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांची माहिती पारनेर | नगर सह्याद्री मागील चार महिन्यापासून राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या वेत...
शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांची माहिती
पारनेर | नगर सह्याद्रीमागील चार महिन्यापासून राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी जिल्हा परिषदांना दिला जाणारा निधी हा कमी प्रमाणात दिला जात आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन होण्यास विलंब होत आहे. याची दखल घेऊन राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना संपूर्ण राज्यभर तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदने गुरुवारी दिली आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला असता गेल्या चार महिन्यापासून पहिल्या टप्प्यात दोन तालुके दुसर्या टप्प्यात तीन तालुके तिसर्या टप्प्यात चार तालुके व आता सहा तालुयांचा वेतन निधी कमी आलेला आहे. त्यामुळे वेतनामध्ये विसंगती निर्माण झाली असून काही तालुयांचे वेतन केले जाते. तर काही तालुयांची वेतन केले जात नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदने पाठवली आहेत. त्याचबरोबर सर्व १४ तालुयांचे तहसीलदार यांच्यामार्फत तालुका शिक्षक परिषदांनी निवेदने पाठवले आहेत. या निवेदन मोहिमेमुळे निश्चितच शासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध होईल अशी संघटनेची अपेक्षा आहे. मात्र यातूनही निधी वितरणामध्ये सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून परिषदेचे संस्थापक आ. संजय केळकर यांचे नेतृत्वाखाली शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय फरक बिलासाठी व इतर फरक मुलांसाठी एक रुपयाचा देखील निधी शासनाकडून जिल्हा परिषदांना वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व फरक दिले प्रलंबित आहेत. त्यापासून प्राथमिक शिक्षक वंचित आहेत. या सर्व बाबींचा गांभीर्याने शासनाने विचार करून निधी वितरित करावा अशी मागणी अहमदनगर शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, कार्याध्यक्ष राम निकम, सरचिटणीस दत्तात्रय गमे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष खामकर, शिक्षक परिषदेचे कार्या. चिटणीस गणेश वाघ, शरद कोतकर, नगर तालुका शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या वेतनासाठी आमदार लंकेंचा पुढाकार
प्राथमिक शिक्षकांचे वेतनाबाबत शासनाकडून होत असलेल्या दरगाईबाबत शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी आमदार नीलेश लंके यांचे लक्ष वेधले असता तत्काळ आमदार लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन शिक्षकांच्या वेतनासाठी नियमीत निधी उपलब्ध करुण देण्याची मागणी केली.
COMMENTS