अहमदनगर । नगर सह्याद्री प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्य...
अहमदनगर । नगर सह्याद्री
प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली असता, शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी जोरदार घोषणांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा गजर करण्यात आला.
अनिल शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाला या युतीतून एक नवी दिशा मिळाली आहे. भीमशक्ती व शिवशक्तीच्या एकत्रीकरणातून बहुजन समाजाला बळ मिळणार आहे. शहर व जिल्ह्यात दोन्ही पक्ष एकत्रितपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात आलेले पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या जल्लोषप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, सुनील क्षेत्रे, सोमा शिंदे, संतोष मोकळ, मधुकर पावसे, संजय उनवणे, किरण जाधव, महिला जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, अक्षय बोरुडे, संघा गायकवाड, अमोल जाधव, आदर्श उघडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाला या युतीतून एक नवी दिशा मिळाली आहे. भीमशक्ती व शिवशक्तीच्या एकत्रीकरणातून बहुजन समाजाला बळ मिळणार आहे. शहर व जिल्ह्यात दोन्ही पक्ष एकत्रितपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS