नाशिक / नगर सहयाद्री- नाशिक शहरत पोलीसांनी गस्त वाढवली आहे.ठिकठिकाणी नाकाबंदी करून शहरातील चोरांना पकडण्याचा प्लॅन पोलीस करत आहे. मत, त्याच ...
नाशिक / नगर सहयाद्री-
नाशिक शहरत पोलीसांनी गस्त वाढवली आहे.ठिकठिकाणी नाकाबंदी करून शहरातील चोरांना पकडण्याचा प्लॅन पोलीस करत आहे. मत, त्याच चोरांनी नाशिक शहर पोलिसांना आव्हान दिले आहे. दुचाकीवरुन पेट्रोलिंग केले जाते तीच दुचाकी चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली आहे. पोलीस गेलेल्या सरकारी दुचाकी तरी शोध लावतील का ? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक शहरातील दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी ॲन्टी व्हेईकल थीफ स्क्वॉड हे पथक अपयशी ठरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.गस्तीवर ज्या दुचाकीचा वापर केला जातो त्याच दुचाकीची चोरट्यांनी चोरी केल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होऊ लागली आहे.रविवारी नाशिकमध्ये तीन ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
हवालदार नरेंद्र शिवाजी चौधरी यांना हस्तीसाठी दिलेली दुचाकी चोरीला गेली आहे.चौधरी यांनी दुचाकी वॉशिंगसाठी दिली होती, आडगाव परिसरात असलेल्या वॉशिंग सेंटरमधून दुचाकी चोरीला कशी गेली याबाबत तपास सुरू आहे
COMMENTS