सुपा चौक मोकळा केल्याशिवाय शांत बसणार नाही: अतिक्रमण धारकांना पंधरा दिवसांची मुदत शरद रसाळ | नगर सह्याद्री संपूर्ण राज्यात गाजलेल्या तालुक्...
सुपा चौक मोकळा केल्याशिवाय शांत बसणार नाही: अतिक्रमण धारकांना पंधरा दिवसांची मुदत
शरद रसाळ | नगर सह्याद्रीसंपूर्ण राज्यात गाजलेल्या तालुक्यातील सुपा येथील अतिक्रमणे विरोधात पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावेंनी सिंघम भुमिका घेतल्याने अतिक्रमण धारकांची पळता भुई थोडी झाली आहे. अतिक्रमणधारकां विरोधात दैनिक नगर सह्याद्री ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.
अतिक्रमणामुळे सुपा चौकाचा श्वास कोंडला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. सुपा येथील अतिक्रमणे विरोधात गोकावे यांनी खमकी भुमिका घेतल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुरूवार दि.५ रोजी दुपारी तीन वाजता पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावेंसह पोलिस फौजफाटा सुपा चौकात दाखल झाला. यादरम्यान अतिक्रमणे धारकांची एकच धांदल उडाली. यावेळी काही अतिक्रमण धारकांनी स्वतः हून आपल्या टपर्या काढून घेतल्या. यावेळी पोलिस निरीक्षक गोकावे यांनी स्वतः हा उभे राहून बसस्थानक परिसरातील झाडे काढण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सुपा बस स्थानक अतिक्रमणामुळे पूर्ण झाकून गेला आहे. बस स्थानकासमोर अतिक्रमण केल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या बस स्थानकात न येता बाहेर रस्त्यावर उभे राहून प्रवाशांना घेत होत्या. यामुळे देखील अनेक वेळा अपघात झाले आहे.
सुमारे दहा ते बारा गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीमुळे सुपा शहराचा नव्याने विस्तार होत आहे. त्यात आठवडा बाजार बुधवारी असल्याने सुपा मेन चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यात गेले दोन महिन्यांपासून शासकीय विश्रामगृह ते सुपा चौक यादरम्यान शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असल्याने अत्यावश्यक सेवा देणारी रूग्णवाहीकेला रस्ता पार करताना मोठी कसरत करावी लागत होती. तर प्रवाशांना तासंतास मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत पोलिस प्रशासनाने योग्य भूमिका घेतल्याने निश्चितच सुपा शहरातील रस्त्यांचा व सुपा चौकाचा श्वास मोकळा होईल यात शंका नाही.
COMMENTS