रायगड / नगर सहयाद्री- महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली....
रायगड / नगर सहयाद्री-
महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती.2 जानेवारीपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.
रायगड इथे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आढळली आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबई इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
भरतीसाठी मैदानी चाचणी सुरु आहे. परंतु या मैदानी चाचणी सुरु असतानाच रायगडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड इथे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आढळली आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
रायगड इथे पोलीस भरतीसाठी सध्या मैदानी चाचणी सुरु आहे. या चाचणीदरम्यान तीन उमेदवारांकडे उत्तजेक द्रव्य असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या तिघांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, पाम ओमेगा व्हीआयटी सिई टॅब्लेटस, औषधी द्रव्याच्या तीन काचेच्या बाटल्या पोलिसांना आढळल्या.
हे तिन्ही उमेदवार पुणे आणि अहमदनगर इथून रायगडमध्ये पोलीस भरतीसाठी आले होते. वरसोली इथल्या कॉटेजमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. या उमेदवारांकडे न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, पाम ओमेगा व्हीआयटी सिई टॅब्लेटस, औषधी द्रव्याच्या तीन काचेच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहे.
COMMENTS