मुंबई । नगर सह्याद्री - सगळ्यांना वेड लावणारे pogo या चॅनेल वरचे मिस्टर बीन यांचा आज वाढदिवस आहे. रोवन सेबॅस्टियन अॅटकिन्सन हा एक इंग्रजी ...
मुंबई । नगर सह्याद्री -
सगळ्यांना वेड लावणारे pogo या चॅनेल वरचे मिस्टर बीन यांचा आज वाढदिवस आहे. रोवन सेबॅस्टियन अॅटकिन्सन हा एक इंग्रजी लेखक, विनोदकार आणि अभिनेता आहे. संपूर्ण जग रोवनला त्याच्या खऱ्या नावापेक्षा मिस्टर बीन या कॅरेक्टरनेच ओळखतात. रोवनची ओळख पहिल्यापासून मिस्टर बीन नावानेच आहे. आज रोवन ऍटकिन्सनचा वाढदिवस आहे. मिस्टर बीन या वर्षी ६७ वर्षांचे झाला आहे.
रोवनचा जन्म 6 जानेवारी 1955 रोजी डरहॅम काउंटी, कॉन्सेट, इंग्लंड येथे झाला. रोवनचे वडील एरिक ऍटकिन्सन हे शेतकरी आणि कंपनीचे संचालक होते. रोवनने क्वीन्स कॉलेज, ऑक्सफर्ड येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. रोवनचे वडीलही याच कॉलेजमध्ये शिकले होते. रोविन खूप आनंदी व्यक्ती आहे. असे नेहमीच सर्वांना वाटते.
मिस्टर बीन ही व्यक्तिरेखा जितकी लोकांना हसवते तितकाच तो खऱ्या आयुष्यातही सर्वांना हसवतो. रोवन म्हणतो की, भूमिका करताना मला आनंद झाला नाही, कारण यात खूप जबाबदारी होत्या. पण मिस्टर बीनची भूमिका सेबॅस्टियन अॅटकिन्सनला तणावपूर्ण आणि थकवणारी वाटली.
'द अॅटकिन्सन पीपल' कॉमेडी मालिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. रोवनने 1978 मध्ये 'द अॅटकिन्सन पीपल' कॉमेडी मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच काळात ते 'बीबीसी रेडिओ ३' साठी काम करत होते. सोबतच रोवनने त्याच्या फिल्मी करियरमध्ये 'कॅन लाफ्टर', 'नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज' या कार्यक्रमातही काम केले होते. मिस्टर बीन व्यतिरिक्त रोवन ब्लॅकॅडर, द सिक्रेट पोलिसमन बाउल आणि द थिन ब्लू लाईन यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसला आहे.
रोवन अॅटकिन्सन हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे. हॉलिवूडमधील बड्या कलाकारांपेक्षा रोवनची ओळख सर्वाधिक आहे. मिस्टर बीन्सचा 'बायऊ' हा लंडनमधला एक आलिशान राजवाडा आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. या अभिनेत्याकडे जगातील सर्वात महागड्या कार देखील आहे. त्याच्याकडे मॅक्लारेन F1 आहे. त्याची मार्केट प्राईज सुमारे 80 ते 100 कोटी रुपये आहे. यावरून, त्याचे वार्षिक उत्पन्न किती असू शकते आणि तो ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक का आहे याची कल्पना येऊ शकते.
रोवनला आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लडच्या राणीने 2013 मध्ये 'कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' ही पदवी प्रदान केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रोवन अॅटकिन्सन हे सुमारे आठ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक आहे. अभिनेत्याचा प्रसिद्ध शो मिस्टर बीन काही काळ चालला. मिस्टर बीनचे हे पात्र लहानांपासून थोऱ्यांना सर्वांनाच खूप आवडला होता. आजही लोक या शोचे जुने एपिसोड पाहतात.
COMMENTS