पुणे / नगर सहयाद्री- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली. आता हाणामारी करण्यात विद्यार्थिनी देखील म...
पुणे / नगर सहयाद्री-
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली. आता हाणामारी करण्यात विद्यार्थिनी देखील मागे राहिल्या नाहीत. या विद्यार्थिनींनी चक्क दगडाने मारहाण केली आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा भांडणाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्राप्त मीहितीनुसार, दोन-तीन मुली घोळक्याने एका विद्यार्थिनीला जबर मारहाण केली आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थिनीच्या बहिणीने दुसऱ्या मुलीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी दगडाने मारहाण करून तुडवलं आहे. या घटनेचे व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले आहेत. मात्र, मारहाण करणाऱ्या या विद्यार्थिनींवर कॉलेज प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काही विद्यार्थिनी या महाविद्यालयाच्या ड्रेसवर आहे. तर काही साध्या ड्रेसवर आहे. महाविद्यालयाच्या ड्रेसवर असून या विद्यार्थिनी हाणामारी करताना दिसत आहे. विद्यार्थिनींची हाणामारी सुरू झाल्यावर रस्त्यावरील इतर काही महिला सोडवण्यास आल्या.मात्र,त्यांनाही या विद्यार्थिनी ऐकत नव्हत्या. तर रस्त्यावरील काही माणसं विद्यार्थिनींचे हाणामारीचा व्हिडिओ कॅमेरात कैद करण्यात व्यग्र होती.
COMMENTS