मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला खडसावले होते. सत्ता आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायच...
मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला खडसावले होते. सत्ता आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते, असे ते म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले असून, आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले होते, सत्ता आलेल्यांची विधाने वेगळी आहेत. काही लोक तुरुंगात टाकणार, तर काही जामीन रद्द करु, असा इशारा देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाहीत. जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यंमत्री शिंदे यांनी यास उत्तर दिले आहे. ते म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत. आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आज आणि उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. आम्ही महाराष्ट्रातील जनतेचे सेवक म्हणून काम करतोय.
शरद पवारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले. ते म्हणाले, आमचा संपर्क जमिनीवरील लोकांशी आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालतो. त्यामुळे नेमके हवेत कोण आहे, हे शरद पवार यांनी तपासावे.
COMMENTS