पठाण या चित्रपटाचे त्यांनी कौतुक करत राम चरण म्हणाले की, शाहरुख खानचे अॅक्शन सीक्वेन्स पाहण्यासाठी तो खूप उत्सुक आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
तेलुगू चित्रपटाचा सुपरस्टार राम चरण यांनी तेलुगू भाषेत डबिंग केलेल्या पठाण चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबद्दल ट्विट केले. पठाण या चित्रपटाचे कौतुक करत राम चरण म्हणाले की, शाहरुख खानचे अॅक्शन सीक्वेन्स पाहण्यासाठी तो खूप उत्सुक आहे, जे भारतीय सिनेमात पहिल्यांदाच चित्रीत झाले आहेत.
आज पठाण चित्रपटाचा ट्रेलर तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला, त्यानंतर चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. तेलुगू सुपरस्टार राम चरणनेही पठाण चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल उत्सुकता व्यक्त केली. पठाणच्या तेलगूमध्ये डबिंगबद्दल त्याने ट्विट केले आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच शाहरुख खानच्या अॅक्शन बाबत उत्सुकता व्यक्त केली.
पठाण चित्रपट हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगुचा समावेश आहे.
COMMENTS