मुंबई - शाहरुख खानच्या पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 52.5 कोटी रुपयांची कमाई केली...
मुंबई -
शाहरुख खानच्या पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 52.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता चित्रपटाचे शोदेखील वाढवण्यात आले आहेत.
मात्र दुसरीकडे चित्रपटाला विरोधदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. बॉलिवूडमधील घडामोडी, सामाजिक विषयांवर ती कायमच भाष्य करत असते. तिने ट्वीट केलं आहे, विरोध हा कायमच हरतो. अशी पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कोणाचे नाव न घेता पठाणला विरोध करणार्या लोकांना टोला लगावला आहे.
रिचा चड्ढाने नुकतीच अली फाजल याच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. ’पठाण’ आज जगभरात प्रदर्शित झाला, पण मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये काही गटांच्या विरोधानंतर चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले होते. पण, हे प्रकरण लवकर मिटवण्यात यश आलं असून दुपारनंतर त्याचे शो सुरू झाले. पहिल्याच दिवशी पठाण’ला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षक अक्षरशः मोठ्या संख्येने रांगा लावत आहेत.
COMMENTS