सुपा / नगर सह्याद्री- माणसांप्रमाणेच जनावरांवर सुद्धा प्रभावीपणे होमिओपॅथिक उपचार पद्धती करता येऊ शकते याचा प्रचार आणि प्रसार आता बर्यापैकी...
सुपा / नगर सह्याद्री-
माणसांप्रमाणेच जनावरांवर सुद्धा प्रभावीपणे होमिओपॅथिक उपचार पद्धती करता येऊ शकते याचा प्रचार आणि प्रसार आता बर्यापैकी होऊ लागला आहे. शेतकरी अँटिबायोटिक औषधोपचार पद्धती पासून हळूहळू दूर जाऊ लागले आहेत. त्याचे परिणाम आणि धोके निदर्शनास येऊ लागल्याने पशुंवर होमिओपॅथिक ही जुनी उपचार पद्धती कशी फायदेशीर आहे. याबाबत प्रबोधन आणि जनजागृती करण्याचे काम तालुक्यातील चोंबुत येथील पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. महेश पारखे करीत आहेत.एकूण 13 जिल्ह्यांमध्ये ते कार्यरत आहेत.
पाडळी रांजणगाव येथील दूध उत्पादक शेतकर्यांची त्यांनी नुकतीच एक कार्यशाळा घेतली. यासाठी त्रिमूर्ती दूध संकलन आणि शीतकरण केंद्राने पुढाकार घेतला.शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय केला जातो. विशेष करून दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. पारनेर तालुका दूध उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात दूध संकलन करून ते विविध कंपन्यांना पाठवले जाते. त्याचबरोबर शहरी भागात सुद्धा दुधाची विक्री केली जाते. पारनेर सह अहमदनगर जिल्ह्यात लाखो लिटर दूध संकलन होते. यातून शेतकर्यांना फायदा होत असल्याने दिवसेंदिवस गाईची संख्या वाढतच चालली आहे. जास्त दूध देणार्या गायांना वेगळ्या प्रकारचे आजार जडतात.
त्याचबरोबर निरनिराळे साथीचे रोग सुद्धा येतात. त्यामध्ये गाई वासरे दगावले सुद्धा जातात. आजाराने ग्रासलेल्या गाई जास्त दूध देत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर होतो.वेगवेगळे पशु वैद्यकीय डॉक्टर विशेष करून ऍलोपॅथी म्हणजेच अँटिबायोटिक औषध गाईंना देतात. त्याचा परिणाम तिच्या शरीरावर होतो. अप्रत्यक्षरित्या गाईंची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्याचबरोबर आयुर्मान सुद्धा घटते .
अशा प्रकारच्या उपचार पद्धतीमुळे अनेकदा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. ऍलोपॅथिक उपचार पद्धती खर्चिक सुद्धा असते. त्यामुळे एकूण उत्पन्नातून हा खर्च करावा लागत असल्याने कधीकधी दूध व्यवसाय तोट्यात जातो. या सर्व पार्श्वभूमीवर जनावरांवर सुद्धा होमिओपॅथिक उपचार पद्धती प्रभावी ठरवू लागले आहे. तर अशा प्रकारच्या औषधांची किंमत सुद्धा तुलनेने कमी आहे. त्याचबरोबर त्याचे साईड इफेक्ट जनावरांवर होत नाहीत. कित्येक दुर्दम्य आजारातील पशु होमिओपॅथिक उपचार केल्यामुळे बरे होतात.
दुधाचे प्रमाण सुद्धा कमी न होता ते वाढत जाते. गेल्या काही वर्षांपासून पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. महेश पारखे अँटिबायोटिक मुक्त औषध उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. एकूण 13 जिल्ह्यांमध्ये या संदर्भात त्यांचे काम सुरू आहे. पारनेर तालुक्यामध्ये हजारो जनावारांवर डॉ पारखे यांनी उपचार केले आहेत. ऍलोपॅथिक उपचार पद्धतीने उपचार करून बरे न होणारे जनावरे त्यांनी आजारातून बाहेर काढले. उत्तर, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या संदर्भात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला.
पाडळी रांजणगाव येथील त्रिमूर्ती दूध संकलन आणि शितिकरण केंद्रात नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकर्यांनी सहभाग घेतला. दुधाळ गाई आणि कालवडींचे संगोपन, पौष्टिक आणि सकस चारा, वेगवेगळ्या आजारांवर होमिओपॅथिक उपचार पद्धत. यासारख्या विविध विषयांवर डॉ. महेश पारखे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेतकर्यांच्या समस्या अडचणी आणि प्रश्नांना उत्तरे दिली.
त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात डॉ. पारखे यशस्वी झाले. अँटिबायोटिक औषधांचे अंश हे गाईंच्या दुधात उतरते त्याचा परिणाम दूध पिणारे व खाणार्यांच्या आरोग्यावर होतो. परंतु होमिओपॅथिक औषध उपचार पद्धतीचे कोणतेच तोटे नसल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्रिमूर्ती दूध संकलन व शितकरण केंद्राचे प्रमुख चेअरमन पंडित लक्ष्मण करंजुले यांनी पुढाकार घेतला.
COMMENTS