खासदार सुजय विखे यांच्याकडे विश्वनाथ कोरडे यांनी केली होती मागणी पारनेर । नगर सह्याद्री - जवळे आणि परिसरातील सुमारे 50 हजार टन ऊस गाळपाशिव...
खासदार सुजय विखे यांच्याकडे विश्वनाथ कोरडे यांनी केली होती मागणी
पारनेर । नगर सह्याद्री -
जवळे आणि परिसरातील सुमारे 50 हजार टन ऊस गाळपाशिवाय शेतात उभा आहे. सर्व उसांना तुरे फुटले आहे. यामुळे शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भाजपाचे विश्वनाथ कोरडे यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रवरा कारखान्याची यंत्रणा पाठवून ऊस उत्पादकांना दिलासा दिला.
शेतकर्यांचे होणारे नुकसान भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदसय विश्वनाथ कोरडे यांनी खा. विखे पाटील यांच्याशी चर्चा करून वाचविले. शेतकर्यांच्या मागणीची खा. विखे पाटील यांनी दखल घेऊन बुधवारी जवळे येथे प्रवरा व्यवस्थापनास शेतकर्यांची चर्चा करण्यासाठी पाठविले होते. यावेळी भाजपाचे विश्वनाथ कोरडे, प्रवरा कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वास कडू, संचालक संजय आहेर, शेतकी अधिकारी चेत्रे, शिवाजी नाना सालके, गोरक्ष पठारे, कृष्णाजी बडवे, संदीप सालके, संपत सालके, किरण झंजाड, दिलीप मदगे, नवनाथ सालके, ज्ञानदेव पठारे, अशोक सालके, विशाल बरशिले, रामराव सालके, गोविंद बडवे, अर्जुन सालके, प्रभाकर पठारे, गणेश सालके, बाबाजी लोखंडे, बाळासाहेब सालके, राहुल सालके आदी उपस्थित होते.
COMMENTS