मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी मैत्री जपल्याने कारवाई पारनेर । नगर सह्याद्री तालुक्यातील गारगुंडीचे रहिवासी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच...
पारनेर । नगर सह्याद्री
तालुक्यातील गारगुंडीचे रहिवासी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे उद्योजक सुनील फापाळे यांची शिवसेना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतून शुक्रवारी हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सामना मुखपत्रातून दहा शिक्षक नेत्यांवर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ठपका ठेवत हकालपट्टी केली असल्याचे प्रसिद्ध केले आहे.
गेल्या 40 वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक नेते ते ज्ञानदाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षक नेते सुनील फापाळे यांनी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत होते. ठाणे मुंब्रा कळवा या भागासह जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी व संघटन वाढीसाठी अनेक वर्ष काम केले असताना शिवसेना पक्षामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी उद्योजक सुनील फापाळे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध निर्माण झाले होते.
अनेक वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनील फापाळे यांनी शिवसेना व शिक्षक संघटनेसाठी एकत्र त्यांनी काम पण केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा अंतर्गत वाद चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक ही सुनील फापाळे यांची जास्त असल्याने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने सामना हे आपल्या मुखपत्रामध्ये हकालपट्टी केली असल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सुनील फापाळे यांच्यासह 10 जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
शिंदे यांच्याशी मोटरसायकलवरची मैत्री : फापाळे
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये एक कट्टर व कडवा शिवसैनिक म्हणून पक्ष संघटनासाठी व बांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम केले असून मी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्री व घरगुती सबंध सर्वश्रुत आहे. अनेक वर्ष आम्ही एकाच मोटर सायकल वरून ठाणे जिल्ह्यासह मुंबईमध्ये प्रवास केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी मोटरसायकल वरची मैत्री असल्याचे उद्योजक सुनील फापाळे यांनी आवर्जून सांगितले.
COMMENTS