पारनेर | नगर सह्याद्री राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुयातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्...
पारनेर | नगर सह्याद्री
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुयातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला असून गटविकास अधिकारी किशोर माने व अपर्णा माने, विश्वस्त चंद्रभान ठुबे व विद्या ठुबे, माजी सरपंच अशोक घुले व देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता आरती, महाभिषेक व पूजा होऊन मोठ्या उत्साहात व भक्तीभावात प्रारंभ झाला. यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.
यावेळी उपाध्यक्ष महेश शिरोळे, नायब तहसीलदार गणेश आढारी, खजिनदार तुकाराम जगताप, सचिव जालिंदर खोसे, विश्वस्त राजेंद्र चौधरी, सुरेश फापाळे, रामदास मुळे, धोंडीभाऊ जगताप, कमलेश घुले, अजित महांडुळे, सुवर्णा घाडगे, दिलीप घुले, पुष्पा घुले, कैलास घुले, कोमल घुले, चंद्रकांत कुलकर्णी, स्वप्निल जगताप, गणेश जगताप, पंकज जगदाळे, किरण फातले, अमोल घुले आदी मान्यवरांसह भाविक उपस्थित होते. याअगोदर पहाटे ४ वा देवाला मंगलस्नान, पूजा करण्यात आली नंतर देवाला चांदीचे सिहासन व उत्सव मूर्तीचे अनावरण व साज शृंगार करून सजावट करण्यात आली. सकाळी ६ वा.मान्यवरांच्या हस्ते देवाची महापुजा, अभिषेक, महाआरती झाल्यावर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. सकाळी थंडी असूनही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविक दिवसभर आपल्या कुलदैवताचे येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात तळीभांडार, कुलधर्म कुलाचार करून देवदर्शन घेत होते. यात्रेसाठी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. संघर्ष मित्र मंडळ, अशोक घुले मित्र मंडळ, ग्रामस्थ स्वयंसेवकाचे काम करीत असुन एस टी कडुन पारनेर, नारायणराव, नगर, अकोले, शिरूर येथून कोरठणसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. देवस्थान कडून पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था आदी व्यवस्था करण्यात आली असून यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य पथक, रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
COMMENTS