अहमदनगर । नगर सह्याद्री राज्याच्या साहित्य विश्वातील ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक, अहमदनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक असलेले डॉ. प...
अहमदनगर । नगर सह्याद्री
राज्याच्या साहित्य विश्वातील ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक, अहमदनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक असलेले डॉ. प्रभाकर मांडे यांना नुकताच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सावेडी उपनगर, अहमदनगर व महाराष्ट्र साहित्य परिषद, अहमदनगर शहर शाखा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. मांडे यांचे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे आणि अभिमानास्पद आहे. त्यांनी आपल्या विविध ग्रंथातून मांडलेले विचार, त्यांचा लोकसाहित्यातील अभ्यास आजच्या अन् उद्याच्या पिढीला मार्गदर्शक असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना डॉ. मांडे म्हणाले, मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार माझ्या साहित्याचा सन्मान आहे. गेली अनेक वर्षे मी नगर भूमीत असून मी आता पुरता नगरकर झालो आहे. साहित्यिक व साहित्य क्षेत्रातील काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी झालेली भेट, सर्वांनी माझा केलेला सत्कार मला मनस्वी आनंद देणारा आहे.
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. लीलाताई गोविलकर, प्रा. मेधाताई काळे, डॉ मांडे यांच्या स्नुषा सौ. वृषाली मांडे, मसापचे (पुणे) जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमूख कार्यवाह तथा मसापचे (पुणे) जिल्हा प्रतिनिधी जयंत येलुलकर, मसाप अहमदनगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड, प्रा. डॉ. सुधाकर कुर्हाडे, सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभ्यासक नंदकिशोर आढाव, बन्सी महाराज मिठाईचे संचालक अशोक जोशी, गणराज प्रकाशनचे प्रा. गणेश भगत, ज्येष्ठ छायाचित्रकार संजय दळवी, समाजसेवक जालिंदर बोरुडे, अरुण वाडेकर आदी उपस्थित होते.
COMMENTS