निघोज | नगर सह्याद्री निघोज येथील कराटे विद्यार्थ्यांनी पंजाब येथे नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत अभुतपुर्व यश मिळवले आहे. यामध्ये अंकिता ...
निघोज येथील कराटे विद्यार्थ्यांनी पंजाब येथे नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत अभुतपुर्व यश मिळवले आहे. यामध्ये अंकिता मनोज सोनवणे हिने १४ वर्ष वयोगटातील २५ ते ३० वजन गटांमध्ये महाराष्ट्र विरुद्ध आसाम या सामन्याध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. अन्वेश मंगेश कवाद याने ११ किलो वयो गटांमध्ये तसेच २० ते २५ किलो वजन गटांमध्ये महाराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर रौप्य पदक मिळवले आहे. तन्मय दत्तात्रय बेलोटे ३५ ते ४० वजन गटांमध्ये महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर या सामन्यात रौप्य पदक मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या ओमकार रणसिंग यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
पंजाब येथील स्पर्धेत यशस्वी झालेल्या व विविध पदके मिळवून जिंकलेल्या या कराटे खेळाडुंची निघोज येथे एसटी बस स्थानक ते मंळगंगा मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी या विद्यार्थ्यांचे औशंन करण्यात आले. फुलांचा वर्षाव करीत निघोज येथे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, निघोज ग्रामपंचायत, निघोज ग्रामस्थ, आपला गाव गणपती गणेश मंडळ, पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने त्यांचा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, गणपती गणेश मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, सरपंच चित्राताई वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक भास्करराव सोनवणे, निलेश घोडे, विलासराव हारदे, राहुल वराळ, मास्टर कोच ओंकार रणसिंग, अस्लमभाई इनामदार, मंगेश कवाद, दत्तात्रय बेलोटे, मनोज सोनवणे, मनोज लामखडे,आकाश वराळ, हरेश ससाणे तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले गेली पाच वर्षांपासून ओंकार रणसिंग यांनी या भागातील विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देऊन राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आंतरराज्य स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली असून या विद्यार्थ्यांनी पंजाब येथे जाऊन सुवर्णपदक व रौप्य पदक मिळवून निघोजचा नावलौकिक देशात केला आहे. ओंकार रणसिंग यांना सातत्याने गणपती मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग यांचे पाठबळ मिळाले असून निघोज येथील अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करीत असून निघोज ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन माध्यमातून ओंकार रणसिंग यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही वराळ पाटील यांनी दिली आहे.
COMMENTS