मुंबई । नगर सह्याद्री - आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना दिलासा मिळाला आहे.आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन...
मुंबई । नगर सह्याद्री -
आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना दिलासा मिळाला आहे.आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहे. एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सीबीआयची कारवाई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे.
आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हायकोर्टाने कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडिओकॉन समूहाला ICICI बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर धूत यांनी 2012 मध्ये NuPower Renewables Pvt Ltd (NRPL) मध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.
आयसीआयसीआयकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दोन नातेवाईकांसह धूत यांनी ही फर्म सुरू केली आहे. अज्ञाताने दिलेल्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. जानेवारी 2019 मध्ये, केंद्रीय CBI ने वेणुगोपाल धूत, चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित कलमांसाठी गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये, ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता.
COMMENTS