नगरसेविका दिपाली बारस्कर यांचे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन अहमदनगर | नगर सह्याद्री पाईपलाईन रोड परिसराचा विस्कळीत झालेला पाणीपु...
नगरसेविका दिपाली बारस्कर यांचे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्री
पाईपलाईन रोड परिसराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदनात दिला,
पाईपलाईन रस्ता परिसरातील वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असून रात्री अपरात्री कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मनपा प्रशासनाने रिटर्न वॉल कमी केल्यामुळे पाईपलाईन रोड परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणी प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे तसेच विविध अडचणीला तोंड द्यावी लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे जनतेला पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नगरसेवकांना ही नागरिकांच्या रोशास सामोरे जावे लागत आहे. या पाणी प्रश्नामुळे महिलांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते रात्री अप रात्री सुटणारे पाणी व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे रात्रभर पाण्यासाठी जागे राहावे लागते. महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाणीपुरवठा करूनही पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी होत नाही. मात्र मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लागत नाही. आता मात्र आमच्या सहनशीलतेचा अंत झाला असून येत्या ३१ जानेवारीपर्यंत पाईपलाईन रोडचा पाणीपुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचे निवेदन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदनाद्वारे नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, कुसुम दरेकर, ज्योती शेंडगे, योगिता गाडे, सुनिता शेडे, अशा दहातोंडे, नीलकमल माळी, गीतांजली देशमाने आदी महिला यावेळी उपस्थित होत्या. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते उपस्थित होते.
COMMENTS