अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहर व भिंगार येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढुन चोरी करणार्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हे...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहर व भिंगार येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढुन चोरी करणार्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. रियाज फैय्याज इराणी (वय ४२ रा. इराणी गल्ली, ता. श्रीरामपूर) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख ५२ हजार रूपये किंमतीचे ६.४ तोळे (६४ ग्रॅम) सोन्याचे दागिने जप्त केले.
त्याने कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील एका दाखल गुन्ह्याची कबूली दिली आहे. १५ जानेवारी २०२३ रोजी माया किरणकुमार वनारसे (वय ४०, रा. सूर्यानगर, तपोवन रोड) या नगर-औरंगाबाद रोडवरील फिरोदिया वृद्धाश्रमासमोरून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मिनीगंठण ओरबडून नेले होते. या घटने बाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर शहरासह उपनगरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान एक इसम चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकास कळवून खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पथकाने तात्काळ शिवाजी चौकात सापळा लावला. एक संशयित इसम पोलीस पथकास पाहुन पळून जावू लागला. पथकातील पोलीस अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव रियाज फैय्याज इराणी (वय ४२, रा. इराणी गल्ली, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने डिसेंबर व जानेवारीमध्ये अहमदनगर शहर परिसरात साथीदारासह सोनसाखळी चोरी केल्याची कबूली दिली.
COMMENTS