मुंबई । नगर सह्याद्री - हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. मालिकेचे शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटन...
मुंबई । नगर सह्याद्री -
हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. मालिकेचे शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा बॉयफ्रेंड शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतले आहे. तुनिषा शर्माने शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. तुनिषा आणि शिझान हे दोघे सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. तुनिषाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा प्रियकर शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी शिझानवर गंभीर आरोप केले आहे. शिझान सेटवर ड्रग्ज घ्यायचा. इतकेच नाही तर शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषावर धर्मांतरासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव टाकला होता, शिझान तुनिषाचा मानसिक छळ करायचा असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईने केले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत शिझानवर हे आरोप केले आहे.त्यानांतर आता शिझानचे कुटूंबियांनी देखील दावा केला आहे.
शिझानचे कुटुंबीय काय म्हणाले -
1. तुनिषाच्या आईचे आरोप खोटे आहेत, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला नाही
शिझानचे कुटुंबीय म्हणाले- वनिता शर्मा यांनी शिझानवर खोटे आरोप केले आहेत. आम्ही कुणावरही धर्मांतरासाठी दबाव टाकू शकत नाही. आम्ही तिला कधीही हिजाब घालण्याची सक्ती केली नाही. तुम्ही म्हणाला की, मी तुमच्या लेकीला घेऊन दर्ग्यात गेले, तर सांगा कधी घेऊन गेले होते, असा सवाल शिझानची फलक नाजने तुनिषाच्या आईला केला आहे. तुनिषा आणि शिझान खूप आधीच वेगळे झाले होते, असेही फलकने सांगितले.
2. आम्ही तुनिषाच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज प्लॅन करत होतो
शिझानच्या बहिणी म्हणाल्या - आम्ही तिला ओळखत होतो. ती आम्हाला मोठ्या बहिणी मानत होती. 4 जानेवारीला तिचा वाढदिवस आहे. त्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन करत होतो. वडिलांच्या निधनानंतर तुनिषाने तिचा वाढदिवस कधीही मोठ्या प्रमाणात साजरा केला नव्हता. आम्ही तुनिषाला फक्त 5 महिन्यांपासून ओळखत होतो.
3. तुनिषाची आई सतत फोन करायची
शिझानची बहीण म्हणाली - आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे, की पाच महिन्यांत आम्ही तुनिषाला देता येईल तितका आनंद दिला आहे. तुनिषा आतून खूप दु:खी होती. तिची आई तिला कुठेच बाहेर जाऊ देत नव्हती. तिला यातून बाहेर पडायचे होते. कुठेही गेली तरी, तिची आई सतत तिला फोन करायची. आम्ही पहिल्यांदा तिला समुद्र दाखवला ती खूप आनंदी होती.
3. वनिता यांना शिझानने तुनिषाप्रमाणे आत्महत्या करावी असे वाटते
बहिणी म्हणाल्या - आम्ही तुनिषाला दर्ग्यात नेले तर त्याचा काही फोटो आहे का? शिझानने तिच्यावर हात उगारला होता, याचा काही पुरावा आहे का? राहिला प्रश्न उर्दू भाषा बोलण्याचा तर शूटिंगदरम्यान उर्दू बोलावे लागते. आमची एक मुलगी गेली आणि आता आमच्या मुलाने आत्महत्या करावी अशी वनिताजींची इच्छा आहे.
4. वाढदिवशी आई वनिताने तुनिषाचा मोबाईल तोडला होता
शिझानच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे, तुनिषाला टीव्ही मालिकांमध्ये काम करायचे नव्हते. तिला जग बघायचे होते. तुनिषाचे तिच्या कुटुंबाशी चांगले संबंध नव्हते. आई वनिता हिने वाढदिवशी तुनिषाचा मोबाईल फोडला होता. तुनिषाला पैशांची अडचण होती. तुनिषाच्या पैशांवर तिच्या आईचे नियंत्रण असायचे. तुनिषाला हजार दोन हजार रुपयेदेखील आईला मागावे लागायचे. त्यासाठी तिची आई तिला प्रश्न विचारायची, असा दावा शिझानच्या बहिणींनी केला आहे.
5. तुनिषाची अल्बम साँगसाठी जबरदस्तीने सही घेतली गेली
शिझानची बहिण म्हणाली, "आत्महत्येआधी तुनिषा आणि माझे बोलणे झाले होते. आवाजावरुन ती आनंदी वाटत होती. नाताळची दोन दिवसांची सुटी तिला चंदीगडला साजरी करायची होती. सुटी मिळवण्यासाठी तिने प्रोडक्शन हाऊसला विनंती करण्यास मला सांगितले होते. प्रोडक्शन हाऊसकडून तिला सुटी मिळत नव्हती. तुनिषाच्या आईने जबरदस्तीने दोन म्युझिक व्हिडिओ साइन केले होते. मी तिचे तिकीट बुक केले होते. तिच्या सुटीसाठी प्रोडक्शन हाऊसला विनंती करत होते."
6. लव्ह जिहादचा संबंध नाही
शिझानचे कुटुंबीय म्हणाले - शिझानने तुनिषाला कानाखाली मारली तेव्हा तुम्ही काही बोलला का नाहीत, तेव्हा गप्प का बसला. पोलिसांनी लव्ह जिहादचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केले आहे. वनिताजी, तुमची लेक गेली आहे, तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की, तिने हे का केले, हे पाऊल का उचलले. पण तुम्ही मात्र दुसऱ्याला टॉर्चर करताय.
शिझान खानला 31 डिसेंबर रोजी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.
तुनिषाची आई म्हणाली,
तुनिषाच्या आईने शिझानवर 7 गंभीर आरोप केले होते
1. तुनिषा म्हणाली होती- शिझानने तिचा वापर केला.
2. शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा खूप नाराज होती.
3. सीरियलच्या सेटवर शिझानने तुनिषाला थापड मारली होती.
4. शिझानची बहीण तुनिषाला दर्ग्यात घेऊन जायची.
5. शिझान तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता.
6. शिझानच्या आईला सर्व काही माहित होते, तरीही ती काही बोलली नाही.
7. शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाला ट्रॅप केले होते.
तुनिषा घालू लागली होती हिजाब - तुनिषाचे मामा
तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर तिचे मामा पवन शर्मा यांनीही खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितल्यानुसार, शिझानला भेटल्यानंतर तुनिषाच्या वागण्याबोलण्यात खूप फरक झाला होता. तिचे राहणीमान बदलून गेले होते. इतकेच नाही तर तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती. त्यांनी पोलिसांनी याप्रकरणाचा प्रत्येक दृष्टीकोनातून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गळफास घेण्याआधी शिझानशी बोलली होती तुनिषा:शिझानने सिक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे चॅट डिलीट केले, तीही टीव्ही अभिनेता - पोलिसांची माहिती
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माचे गळफास घेण्याआधी शिझान खानसोबत बोलणे झाले होते. तसेच आरोपी शिझान हा तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.
शीझानची बहीण फलक नाज आणि तुनिषाचे नाते होते घट्ट:अंत्यसंस्काराच्या वेळी रडताना दिसली, तीन आठवड्यांपूर्वी तुनिषाने म्हटले होते- माझी आवडती व्यक्ती! असे तुनिषा बोली होती.
COMMENTS