मुंबई । नगर सह्याद्री - आता संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापणार आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी महापुर...
मुंबई । नगर सह्याद्री -
आता संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापणार आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी महापुरूषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. ज्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा अमोल मिटकरींंनी केला आहे. याबद्दलचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.
यामुळेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना अपशब्द वापरले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला होता. यावरुन संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आम्ही सगळे याच मुद्द्यावर लढत आहोत, मात्र सत्तेत बसलेले नेते फेविकॉल लावल्यासारखे गप्प बसले आहेत. मला असं वाटत की केंद्रातील एखादा तरी मंत्री राजीनामा देवून महाराष्ट्रात येईल, मात्र असे होत नाही. जे हा अपमान सहन करत आहेत ते सर्व XXXची अवलाद आहे. असा घणाणात राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी वापरलेल्या या अपशब्दामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या शिवरायांच्या अपमानामुळेही पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे.
COMMENTS