मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. गुंतवणूक करण्यासाठी रोड शो ची गरज...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. गुंतवणूक करण्यासाठी रोड शो ची गरज नाही. हे राजकारणाचे धंदे बंद करा. सन्मानाने आलेले आहात सन्मानाने परत जा. तुमच्याविषयी आम्हाला प्रेम-आदर आहे. शक्यतो हे राजकीय उद्योग येथे येऊन करु नका. असा इशारा शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
जर कोणते राज्य सिनेउद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर देशासाठी चांगलेच आहे. रोड शो ची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत? जर ते येथील उद्योगपतींची भेट घ्यायला त्यांच्या राज्याच्या विकासाबाबत चर्चा करायला आले असतील तर त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मात्र जर ते आमच्याकडचे उद्योग ओरबडून घेणार असतील तर आम्ही आक्षेप घेऊ. मुंबईत गुंतवणूकीसाठी रोड शो करणार असतील तर त्याची काय गरज आहे. आपण येथे राजकारण करायला आला आहात की आपल्या राज्याचा विकास साधायला असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, मुंबईची चित्रपटसृष्टी ही पूर्ण देशाची आहे. दादासाहेब फाळकेंनी चित्रपटसृष्टीचा पाया रचला आहे. ते महाराष्ट्राचे होते. जर योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या राज्यात फिल्मसिटी बनवू इच्छित असतील तर त्याचे स्वागत आहे. हैदराबादमध्ये देखील फिल्म इंडस्ट्री आहे. आणि मुंबईतील चित्रपटसृष्टी कोणी घेऊन जाऊ शकत नाही. अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षित येथून लखनऊ, गाझियाबादला जाऊन राहणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
COMMENTS